सुरक्षा रक्षकाच्या हत्येप्रकरणी एकास बेड्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

demo-image

सुरक्षा रक्षकाच्या हत्येप्रकरणी एकास बेड्या

मुंबई, दि. १ : पूर्वीच्या वादातून सुरक्षारक्षकाची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या करणाऱ्याला अखेर क्राईम ब्रँच युनिट-९ ने अटक केली आहे. जयशंकर मिश्रा असे त्याचे नाव असून मिश्राच्या अटकेसाठी युनिट-९ च्या पथकाने दोन दिवस किंग सर्कल परिसरात पाळत ठेवली होती
मृत राजेश कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी होत. तो सांताक्रुझ पश्चिम येथे सुरक्षा रक्षकाचे काम करायचा. काही महिन्यांपूर्वी जयशंकर आणि राजेशकुमार  मध्ये वाद झाला होता. बुधवारी रात्री जयशंकर आणि राजेशकुमार मध्ये वाद झाला. वाद झाल्यावर त्या दोघांमध्ये झटापट झाली होती. त्यानंतर जयशंकर हा घरी गेला. पहाटे पुन्हा तो घटनास्थळी आला. त्याने राजेश कुमारला लाकडी दंडुक्याने, सिमेंट पेव्हर ब्लॉक आणि छत्री डोक्यात मारून जखमी केले. मारहाणीत राजेशकुमार हा जखमी झाला. महाराणीचा प्रकार एका सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आला. त्याने याची माहिती सांताक्रूझ पोलिसांना दिली. पोलिसांनी राजेश कुमारला मृत घोषित केले. राजेश कुमारच्या हत्येप्रकरणी मिश्राविरोधात गुन्हा नोंद केला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास युनिट-९ करत होते. सहाय्यक आयुक्त महेश देसाई यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकातील अधिकाऱ्याने तपास सुरू केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्हीची फुटेजची तपासणी केली. हत्यनंतर मिश्रा हा वडाळा, किंग सर्कल, वांद्रे, दादर, कुर्ला, अंधेरी आणि मालाड येथे गेल्याचे दिसले. तो किंग सर्कल येथे स्थानकात उतरत असल्याचे एका फुटेजमध्ये दिसले. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास पुढे सुरू ठेवला. पोलिसांनी दोन दिवस किंग्ज सर्कल येथे स्थानकात पाळत ठेवली होती. शनिवारी मिश्रा हा किंग सर्कल येथे आला असता पोलिसांनी मिश्राला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली. मिश्राला पुढील कारवाईसाठी सांताक्रूझ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.



2197

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *