खाकीतील सखी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

demo-image

खाकीतील सखी

मुंबई, दि. १७ : लोहमार्ग पोलीस, मुंबई आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, कीर्ती महाविद्यालय,समाजकार्य पदविका बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे खाकीतील सखी हे विशेष अभियान राबविण्यात आले. 

IMG-20230917-WA0015

मा.आयुक्त,लोहमार्ग पोलीस, डॉ.रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. 

IMG-20230917-WA0020


सर्व्ह विथ श्रद्धा संस्थेच्या संस्थापिका श्रद्धा सिंग ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस विजय तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाजकार्य पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसोबत खाकीतील सखी हे अभियान राबविले. 

IMG-20230917-WA0018



IMG-20230917-WA0014

सर्व विद्यार्थ्यांनी सर्व महिला प्रवासी यांना या अभिनव उपक्रमाची माहितीपत्रक देऊन त्यांना सक्रिय सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. समुदाय पोलिसिंग अंतर्गत अत्यंत अभिनव पद्धतीने महिला सुरक्षा या विषयावर हा उपक्रम भविष्यात सर्वदूर राबविणे काळाची गरज आहे.

csmt






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *