प्रेमात अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, ४ तासात गुन्हा उघडकीस - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, २९ मे, २०२५

demo-image

प्रेमात अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, ४ तासात गुन्हा उघडकीस

मुंबई, दि. २९ : ॲण्टाॅप हिल परिसरात प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात इस्माइल अली शेख याचा मृत्यू झाला आहे.

Antop%20Hill%20police%20IMG-20250527-WA0055

अँटॉप हिल येथील बंगाली पुरा, राजीव गांधी झोपडपट्टी येथे ३६ वर्षीय इस्माइल अली जमाल अली शेख याची त्याची पत्नी सुमय्या ईस्माइल शेख (वय, २६) आणि तिचा प्रियकर सकलाईन गोलम किब्रिया शेख यांनी मिळून चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली.


सदर घटना घटना सोमवारी पहाटे घडली असून अँटॉप हिल पोलिसांनी सकलाईन व सुमय्या हिला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमय्या आणि सकलाईन यांच्यात लग्नाच्या आधीपासून प्रेमसंबंध होते. सुमय्याच्या कुटुंबाने तिचा विवाह इस्माइलशी लावून दिला, परंतु तिचे सकलाईनशी असलेले संबंध लग्नानंतरही कायम होते. इस्माइलला पत्नीच्या प्रियकरासोबतच्या संबंधांची माहिती मिळाली होती. यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. सोमवारी रात्री इस्माइल आणि सुमय्या यांच्यात याच मुद्द्यावरून तीव्र वाद झाला. यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुमय्याने सकलाईनला घरी बोलावले. मिळालेल्या माहितीनुसार, सुमय्याने इस्माइलचे पाय पकडले, तर सकलाईनने धारदार चाकूने त्याच्या गळ्यावर आणि छातीवर अनेक वार केले. यानंतर सुमय्यानेही इस्माइलवर चाकूने वार केले. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.


हत्या केल्यानंतर सुमय्याने इस्माइलचा रक्ताने माखलेला मृतदेह घराबाहेर नेला आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खुन दुसऱ्या कोणीतरी केलाचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर सुमय्याच्या जबाबात विसंगती आढळली. सकलाईनने हत्येनंतर घटनास्थळावरून पळ काढला होता, परंतु पोलिसांनी त्याला काही तासांतच अटक केली. हत्येत वापरलेले चाकू जप्त करण्यात आले असून अँटॉप हिल पोलीस ठाणे अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Antop%20Hill

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *