मुंबई, दि. २४ : इस्रोच्या संशोधकांनी यशस्वी केलेल्या चांद्रयान-३ मोहिमेचे मुंबईकरांनी बुधवारी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. कुठे मोठ्या स्क्रीनवर विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे थेट प्रक्षेप करण्यात आले होते.
तर कुठे फटाक्यांची आतषबाजी करणे, तर अनेक ठिकाणी मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. राज्यासह देशभर या निमित्ताने जणू आनंदाच्या चांदण्याला उधाण आले होते.
मुंबईतील शाळा, महाविद्यालय, सरकारी तसेच खाजगी कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची तयारी करण्यात आली होती. तेथे मोठ्या स्क्रीनवर मुंबईकरांनी या प्रक्षेपण्याचा आनंद घेतला. तर ताडदेव चौकात मुंबई शहर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने मोठा स्क्रीन लावण्यात आला होता. तेथे थेट प्रक्षेपण अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर फटाके वाजवून बुंदीच्या लाडवांचे वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा