मेघवाडी पोलीस ठाणे, मुंबई येथे नागरीकांनी सन २०२१, २०२२, २०२३ मध्ये मोबाईल हरविले, चोरी झाल्याबाबत तसेच इतर प्रकारची किंमती मालमत्ता चोरी झाल्याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. नागरीकांच्या तक्रारींची दखल घेवून मेघवाडी पोलीस ठाणेकडुन हरविलेल्या तसेच गुन्हयातील मालमत्तेचा शोध घेण्यात आला.

सदरचे मोबाईल हे बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत तसेच गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, कोलकत्ता, कर्नाटक अशा बाहेरील राज्यातून गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने प्रयत्न करुन गुन्हयातील २ मोबाईल व हरविलेले ४३ मोबाईल असे विविध कंपन्यांचे एकूण ४५ मोबाईल फोन किं.अं. २, ८१, ०००/-/-(दोन लाख ऐक्यांऐशी हजार रु.) तसेच गुन्हयातील हस्तगत एकुण ५, ४३, ०००/- रू.(पाच लाख त्रेचाळीस हजार रु.) किंमतीचे चे सोने व इतर मोल्यवान मुद्देमाल असा एकूण ०८,२४,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल मेघवाडी पोलीस ठाणेकडुन शोध घेवुन तो तक्रारदार यांना सुर्पुद करण्यात आला.
परत करण्यात आलेला मुदूदेमाल विविध कंपन्यांचे एकूण ४५ मोबाईल फोन व गुह्यातील हस्तगत सोने व इतर मौल्यवान मुद्देमाल एकूण अंदाजे किंमत ०८, २४, ०००/-रूपये
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सहआयुक्त (का व सु) श्री. सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री.परमजित सिंह दहिया, मा. पोलीस उप आयुकत श्री.दत्ता नलावडे, परिमंडळ १०, मुंबई, मा.सहायक पोलीस आयुकत, मेघवाडी विभाग, डॉ. अविनाश पालवे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रशांत भरते यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सपोनि सुधीर घाडगे, पोउनि भोसले, पो.ह.क्र. सुदाम नडगे, दत्ता माने, पो.शि. विशाल पवार, प्रशांत बाविस्कर, देवेंद्र ठाकूर यांनी पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा