मुंबई, दि. २० : मुंबईत बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा कोलमडून पडली होती. लोकल उशिराने धावत होत्या. परिणामी, चाकरमानी अडकून पडले होते. हे लक्षात येताच मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला मुंबई महानगरपालिकेचा 'ए वॉर्ड' धावून आला. मुंबई महानगरपालिका च्या 'ए वॉर्ड' तर्फे सहाय्यक आयुक्त मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळच्या वेळेस घरी जाणाऱ्या प्रवाशांना मोफत चहा-बिस्कीट वाटप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा