मुंबई, दि. ११ : बिपोरजॉय चक्रीवादळाने तीव्र रूप धारण केल्याने त्याचा प्रभाव रविवारी मुंबईच्या किनारपट्टीवरही दिसून आला. मरीन ड्राईव्ह, वरळी, वांद्रे परिसरात धुळ आणि वाळूचे लोट उसळले होते. मोसमी पावसापूर्वी उसळलेल्या तुफानी लाटांनी मुंबईकरांना मात्र धडकी भरलेली दिसून येत होती.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मान्सूनपूर्व पावसाने रविवारी मुंबईत हजेरी लावली होती. यावेळी मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर उंच लाटा धडकत होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा