परदेशी महिलेचा विनयभंग करणाऱ्याला तीन महिने तुरुंगवास - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, २९ मे, २०२३

demo-image

परदेशी महिलेचा विनयभंग करणाऱ्याला तीन महिने तुरुंगवास

गुन्ह्याचा जलदगतीने तपास करून विदेशी महिलेला भायखळा पोलिसांनी न्याय मिळवून दिला...

मुंबई, दि. २९ : परदेशी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी रियाज अहमद यास भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात भायखळा पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले. माझगाव न्यायालयाने रियाजला ५००० रुपये आणि तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

image-101

पीडित महिला या पेरू देशाच्या नागरिक आहेत. मार्च महिन्यात त्या भायखळा येथील एका गेस्ट हाऊस मध्ये राहत होत्या. तेथे रियाज हा मॅनेजर म्हणून काम करत होता. रूममध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत रियाज हा आत शिरला. सेल्फीचा बहाणा करून त्याने महिलेच्या विनयभंग केला. घडल्याप्रकरणी महिलेने भायखळा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

महिलेच्या तक्रारीची दखल घेत भायखळा पोलिसांनी रियाज विरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी रियाजला अटक केली. पोलिसांनी रियाज विरोधात अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र सादर केले. तसेच पीडित महिलेसोबत असलेल्या एका महिलेने देखील साक्ष दिली. नुकतीच याबखटल्याची सुनावणी पूर्ण झाली. माझगाव न्यायालयाने रियाजला दोषी ठरवून त्याला ५००० रुपये दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.



1960_page-0001

1960_page-0002

Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *