मोबाईल पुन्हा मिळाल्याने चेहऱ्यावर फुलले हसू - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, २८ मे, २०२३

मोबाईल पुन्हा मिळाल्याने चेहऱ्यावर फुलले हसू

टिळकनगर पोलिसांची उत्तम कामगिरी

दि.२८-५-२०२३

मुंबई, दादासाहेब येंधे : मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला की तो परत मिळण्याची शक्‍यता फारच कमी असते. मात्र, घाटकोपर आणि टिळकनगर पोलिसांनी जानेवारीपासून आलेल्या तक्रारींपैकी २०० मोबाइल शोधून काढले आहेत.


महागड्या मोबाइलपेक्षा त्यातील संपर्क, फोटो, व्हिडीओ तसेच इतर डेटा तक्रारदारांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे गाळ झालेले मोबाइल परत मिळाल्याचा आनंद तक्रारदारांच्या चेहऱ्यावर दिसत होता.


मोबाइल चोरी दिवसागणिक वाढत असल्याने पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विनायक देशमुख आणि उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर पोलिसांनी मोबाइल चोरी, गहाळ होणाच्या तक्रारी तपासण्यासाठी विशेष पोलिस पथक तयार केले. विशेष पथक अधिकारी पद्याकर पाटील यांच्या पथकातील पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांचे नेटवर्क वापरून जानेवारी २०२०३ पासूनच्या तक्रारींचा तपास सुरू केला. मोबाईल चोर, मोबाइल खरेदी विक्री करणारे अशा अनेकांची झाडाझडती घेण्यात आली. त्यामुळे पोलिसांना दीडशे मोबाइल शोधून काढण्यात यश आले आहे. 


टीळकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख, अजय गोल्हार, शिपाई पाटील, दशरथ राणे (तांत्रिक मदत) यांनी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात व तामिळनाडू अशा विविध राज्यांतून सातत्याने पाठपुरावा करून विविध कंपन्यांचे ५१ मोबाईल फोन व २ लॅपटॉप शोधून काढले. अतिरिक्त पोलीस आयुक विनायक देशमुख, आणि उपायुक्त हेमराज यांच्याहस्ते हे मोबाईल तक्रारदारांच्या स्वाधीन करण्यात आले. 






Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज