मुंबई, दि. २४ : मनसे नेते अमित ठाकरेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कॅन्सरग्रस्त मुलांसाठी मुक्ताA2 ओरियन सिनेमागृहात Fast X या बहुचर्चित 3D चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. अर्नेस्ट बोर्जेस मेमोरियल होम आणि श्री. संत गाडगे महाराज धर्मशाळा या सेवाभावी संस्थांमधील सुमारे १००हून अधिक बाल मित्रांसोबत यावर्षीचा वाढदिवस अमित ठाकरे यांनी सर्वप्रथम केक कापून साजरा केला. मनविसेच्या वतीने सर्व मुला-मुलींना विशेष इम्पोर्टेड कुकीज आणि चॉकलेटचे गिफ्टबॉक्स, भेटवस्तू देण्यात आल्या.
या प्रसंगी सर्वांनीच अमित ठाकरेंचं हळवं रूप पाहिलं... या मुलांबाबतची फक्त सहानुभूती नव्हे तर आपुलकी त्यांच्या डोळ्यात आणि कृतीत स्पष्ट दिसत होती. अमित ठाकरे ह्या कॅन्सरग्रस्त मुलांमध्ये रमले, व कर्करोगाने पीडितांची आस्थेने विचारपूस केली.
"वाढदिवसानिमित्त तुम्ही असा उपक्रम राबवून तुम्ही मला खूप सुंदर गिफ्ट दिलं..." असं त्यांनी आवर्जून निघताना सांगितले.
फोटो : viral
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा