रंगारी बदक चाळीत प्रजासत्ताक दिन साजरा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, २६ जानेवारी, २०२५

demo-image

रंगारी बदक चाळीत प्रजासत्ताक दिन साजरा

मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीत ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी मंडळाचे आजी, माजी पदाधिकारी, स्थानिक रहिवाशी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

IMG20250126100449

यावेळी सुनील डीचोलकर यांनी भव्य रांगोळी काढली होती. मंडळाच्या वतीने कोलेस्ट्रॉल तसेच थायरॉईड तपासणी विनामूल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.


IMG20250126104358


लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून कार्यक्रमाला शोभा आणली. मंडळाचे सरचिटणीस, अध्यक्ष व विश्वस्त यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सुशांत नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *