मुंबई, दि. २३ : कुर्ला येथील एम. एम. ज्वेलर्समधील सुमारे ४९८ ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या आणि मंगळसूत्रे चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाने चोराला पकडले आहे. त्यावेळी मालकाकडून अत्यंत वाईट वागणूक मिळत असल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी २८ लाखांच्या दागिन्यावर हात साफ केल्याचे चोराने सांगितले.
एम. एम. ज्वेलर्समधील सोन्यावर डल्ला मारून दुकानातून काम करणारा समंता हा हावडा एक्स्प्रेसने पळून जात असल्याची माहिती कुर्ला शहर पोलिसांना मिळाली. ती माहिती पोलिसांनी भुसावळच्या रेल्वे सुरक्षा दलाला दिली. आरपीएफच्या गुन्हे पथकाकडे आरोपीच्या तपशीलासह फोटो मिळताच सापळा रचला. गाडी भुसावळ स्थानकात पोहोचताच आरपीएफने समंताला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत कागदात गुंडाळलेले ४९८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सापडले. रेल्वे सुरक्षा दलाने आरोपीसह चोरी झालेला २८ लाखांचे दागिने कुर्ला पोलिसांकडे सोपवले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा