मुंबई, दि. २२ : मुंबई तसेच उपनगरात मंगळवारी पहाटेपासून पडलेल्या पावसाने मुंबईकरांची चांगली तारांबळ उडाली. अचानक कोसळलेल्या सरींमुळे पूर्व आणि पश्चिम मार्गासह मुंबईतील अनेक रस्त्यांवर वाहतुकीचा वेग मंदावला होता. रस्ते मार्गाने शाळा, कॉलेज तसेच कार्यालय गाठणाऱ्या विद्यार्थी, चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीमुळे पोहोचण्यास विलंब झाला. ठिकठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या अनेकांच्या वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष आणि ट्विटरवर तक्रारींचा पाऊस दिवसभर सुरू होता.


0 टिप्पण्या