G-20 उत्सवाच्या निमित्ताने मुंबई चकाचक झाली असून शहराला सुंदर रूप लाभत आहे. दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासह अनेक ठिकाणी नेत्रदीपक रोषणाई करण्यात येत आहे. दुभाजकांवर रंगबिरंगी फुलझाडे लावण्यात आली आहेत. मंत्रालय परिसर नीटनेटका करण्यात आला आहे. मुंबईचे हे आकर्षक रूप पाहून सर्वसामान्य मुंबईकरही खुश झाला आहे.


0 टिप्पण्या