मुंबई, दि. १२ : प्रवासी बनून टॅक्सी चालकांना निर्मनुष्य ठिकाणी नेऊन लुटणारी टोळी नेहरूनगर पोलिसांनी जेरबंद केली आहे. ६ डिसेंबरला मध्यरात्री या टोळीने दोन टॅक्सी चालकांना मरीन ड्राईव्ह व कुर्ला पश्चिम येथे प्रवासी असल्याचे सांगून टॅक्सी ठक्कर बापा कॉलनी चेंबूर येथे निर्मनुष्य ठिकाणी आणली. टॅक्सी चालकांना चाकूचा धाक दाखवून त्यांना जखमी केले आणि टॅक्सी चालकाकडे असलेला मोबाईलवर रोख रक्कम अशी लुटून या टोळीने पोबारा केला होता. या प्रकरणी या दोन्ही टॅक्सी चालकांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या आरोपींबाबत कोणतीही माहिती नसताना गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाद्वारे ४ तासांच्या आत या टोळीतील ३ आरोपी व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना अटक केली आहे. अर्जुन राजू भोपारिया, संजय अशोक उजिपुरीया, लेखराज पदमराम नंगलिया या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
1700
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा