संडे स्ट्रीटवर अक्षय कुमारची सायकल वारी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, २० जून, २०२२

demo-image

संडे स्ट्रीटवर अक्षय कुमारची सायकल वारी

संडे स्ट्रीटच्या कार्यक्रमाला अभिनेता अक्षयकुमारने भेट

मुंबई : मुंबईकरांसाठी सुरू असलेल्या संडे स्ट्रीट मोहिमेला काल अभिनेता अक्षयकुमारने भेट दिली. त्यानंतर अक्षय कुमारने नागरिकांसोबत सायकल देखील चालवली.

Sunday%20Street3


मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईकरांसाठी संडे स्ट्रीट हा उपक्रम सुरू केला आहे. दर रविवारी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मोकळ्या रस्त्यांवरून नागरिक योगा, व्यायाम करणे , झुम्बा डान्स आणि विविध खेळांचा आनंद घेतात. संडे स्ट्रीटच्या कार्यक्रमाला काल अभिनेता अक्षयकुमारने भेट दिली. तेव्हा अनेक नागरिक अक्षय कुमार सोबत सेल्फी काढत होते.

Sunday%20street2



कोरोना काळात सर्वत्र शांतता होती. मात्र, यानंतरचे दिवस दिलासाजनक आहेत. संडे स्ट्रीट ही संकल्पना केवळ रविवारीच नाही तर कायम राहावी, नागरिकांनी रोज व्यायाम करावा तसेच सर्व लोकांसोबत चांगले संबंध जोडण्यासाठी संडे स्ट्रीट हा उपक्रम चांगला असल्याचे अक्षय कुमारने यावेळी सांगितले.


संडे स्ट्रीट कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, विश्वास नागरे पाटील, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुरक्षा) दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Sunday%20Street1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *