चेंबूरमध्ये दरड कोसळून दोघे जखमी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, २० जून, २०२२

demo-image

चेंबूरमध्ये दरड कोसळून दोघे जखमी

सायन रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत शनिवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत असतानाच चेंबूरमधील भीम टेकडी येथे काल सकाळी दरड कोसळली. यात दोघे भाऊ जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर एकाला घरी जाऊ देण्यात आले असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अधिक तपास चेंबूरच्या आरसीएफ पोलिस ठाण्याकडून सुरू आहे.

chembur


चेंबूर मधील वाशी नाका परिसरात भीम टेकडी आहे. त्या भीम टेकडीच्या खाली न्यू भारत नगर वस्ती आहे. काल सकाळी ६ वाजता बीएआरसीने बांधलेली संरक्षण भिंत ओलांडून दरड थेट वस्तीवर कोसळली. यात एक मोठा दगड थेट प्रजापती यांच्या दरवाजा जवळ आपटला. त्यामुळे दरवाजा तुटला आणि आज झोपलेले अरविंद प्रजापती आणि आशिष प्रजापती हे दोघे भाऊ जखमी झाले. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार केल्यानंतर आशिष प्रजापति याला घरी सोडण्यात आले आहे. तर अरविंद यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार सुरू आहेत.

chembur(1)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *