मुंबई पोलीस आयुक्त यांची 'संडेस्ट्रीट' अभिनव संकल्पना
मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे मुंबईकरांसाठी रोज नवनवीन धडाकेबाज निर्णय घेत आहेत. आता मुंबईकरांची सुट्टी आनंददायी, आरोग्यदायी व्हावी म्हणून 'संडेस्ट्रीट'ची संकल्पना राबविण्याचे त्यांनी ठरवले आहे.
रविवारी सकाळी पहाटे ६ ते १० दरम्यान मुंबईतील काही निवडक सहा रस्ते हे फक्त मुंबईकरांसाठीच असणार आहेत. त्यावेळेस या रस्त्यांवर कोणतेही वाहन नसेल. त्यामुळे मुंबईकरांना मोकळ्या रस्त्यावर धावता येईल, चालता येईल, व्यायाम व योगा करता येईल तसेच खेळही खेळता येतील.
या रस्त्यांवर आपल्याला अनुभवता येईल 'संडेस्ट्रीट' संकल्पना
- मरीन मरीन - दोरभाई टाटा रोड नरिमन पॉइंट,
- वांद्रे कार्टर रोड,
- गोरेगाव माइंडस्पेसमागील रस्ता,
- डी. एन. नगर लोखंडवाला मार्ग,
- मुलुंड तानसा पाईप लाईन,
- विक्रोळी-पूर्व द्रुतगती महामार्ग -विक्रोळी ब्रिज या रस्त्यांचा समावेश असेल.
Press note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा