नुकत्याच लागलेल्या दहावीच्या परीक्षेत तिने हे सिद्ध करून दाखविले आहे की, महानगरपालिकेच्या शाळेतील विधार्थी देखील कमी नाहीत. शहरातील कोणत्याही मुलांच्या खांद्याला खांदा लावून आपणही कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो, मग तो कोणताही खेळ असो किंवा शैक्षणिक बाब. अदिती हि साईबाबा मुंबई पब्लिक स्कुलची एक फुटबॉल स्ट्रायकर असून तिने २०१९ मध्ये शहर चॅम्पियनशिप देखील जिंकली आहे. साईबाबा पथ फुटबॉल संघात पुढे जात हजारो विद्यार्थ्यांमधून तिची निवड झाली आणि लंडनमधील क्वीन्स पार्क रेंजर्स या टीममध्ये खेळून तिने मनपाच्या शाळेचे नाव परदेशातही उंचावले आहे.
मनपा शाळेचे नाव उंचावले
मुंबई : साईबाबा पथ मुंबई पब्लिक शाळेच्या अदिती पांदिरे या विद्यार्थिनीने दहावीत ९१ टक्के मार्क मिळवून घवघवीत यश मिळविले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा