मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांना श्रद्धांजली - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, ८ जून, २०२२

demo-image

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांना श्रद्धांजली

आवाजाने घराघरांत पोहचलेले व्यक्तीमत्व


मुंबई, दि. ८ : वृत्त निवेदनातून आपल्या आवाजाने घराघरात पोहचलेले, बातम्या, घडामोडींच्या क्षेत्रातील जाणकार आणि निरलस, निखळ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात,  दूरचित्रवाणी वृत्त वाहिन्यांचे युग सुरू होण्या आधीच दिवंगत भिडे यांनी प्रादेशिक बातम्या आणि त्यातही मराठी वृत्त निवेदनात एक मापदंड निर्माण केला. त्यांचा आवाज व्यक्तीमत्वाप्रमाणेच भारी भक्कम होता. त्यांची वृत्त निवेदनाची, सूत्रसंचलनाची शैली ही त्यांची ओळख बनून घराघरात पोहोचली. मराठी बातम्यांमधील शब्दांचे उच्चारण ते संयमीत सादरीकरण यासाठी ते सदैव लक्षात राहतील. ज्येष्ठ निवेदक प्रदीप भिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.




1704

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *