मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

demo-image

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 2 :- ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


'कला क्षेत्रात नितीन यांनी स्वतःच्या हिंमतीवर ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबीयांवर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. 


2557


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *