तरुणाने अचानक मारली एक्सप्रेसमोर उडी
दादासाहेब येंधे : एका तरुणाने भरधाव एक्सप्रेससमोर उडी मारण्याची घटना बुधवारी दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली. यावेळी रेल्वे पोलिसांनी जीव धोक्यात घालून या तरुणाला रेल्वे रुळावरून बाजूला केले. ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तरुणाला वाचवणारा पोलीस कर्मचारी हा बदलापूरचा आहे.
कुमार गुरुनाथ पुजारी असे रेल्वे रुळावर उडी मारणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचे नाव असून तो उल्हासनगरच्या प्रेम नगर टेकडी भागात राहणार आहे. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास कुमार हा विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येऊन उभा राहिला. यावेळी कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस येताना पाहून कुमारने अचानक रेल्वे रुळावर उडी मारली आणि एक्सप्रेस समोर उभा राहिला. ही घटना तिथल्या कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांना लक्षात येताच त्यांनी तातडीने उडी घेऊन या तरुणाला तेथून बाजूला केले व त्याचा जीव वाचवला.
व्हिडीओ 👇 पहा...
viral video
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा