बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, २२ जानेवारी, २०२५

demo-image

बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा

४ महिलांसह तीन जणांना अटक


मुंबई, दादासाहेब येंधे : ऑनलाईन कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका कॉल सेंटरवर सांताक्रूझ पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून त्यात ४ महिलांचा व ३ पुरुषांचा समावेश आहे.


पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रुज पोलीस ठाणेच्या हद्दीत राहणारे तक्रारदार प्रवीण सोळंकी, यांना एका अनोळखी इसमाने कॉल करून तो बजाझीन हॉलिडे ट्रॅव्हल्स कंपनी मधून बोलत असल्याचे सांगून ऑनलाईन कर्ज मिळवून देतो असे सांगून ऑनलाईन कर्ज प्रोसेसिंग फीच्या नावाखाली तक्रारदार यांच्याकडून २ लाख ६० हजार ऑनलाईन रक्कम घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली होती.


तक्रारदार यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता तांत्रिक तपासावरून तक्रारदार यांना पवई येथील पवई प्लाझा येथून आल्याचे समोर आले.सांताक्रूझ पोलीस पथकाने पवई पोलिसांची मदत घेऊन पवई प्लाझा येथे असणाऱ्या एका कॉल सेंटर वर छापा टाकून ४ महिलांसह ७ जणांना अटक करण्यात आली.


छाप्या दरम्यान अटक आरोपींकडुन १५ मोबाईल फोन, ४ लॅपटॉप, ४९ पाकिट एअरटेल कंपनी सिमकार्ड, व्होडाफोन कंपनीचे ८ सिमकार्ड वापरलेले, १ प्रिंटर असा एकूण ४ लाख १५ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पवई प्लाझा येथे सुरू असलेल्या कॉल सेंटर मधून लोकांना ऑनलाईन कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.


%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0,%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9D%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20Press%20Note%20-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *