स्टेडियमची रेकी झाल्याची कुठलीही माहिती नाही-मुंबई पोलीस - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

स्टेडियमची रेकी झाल्याची कुठलीही माहिती नाही-मुंबई पोलीस

मुंबई : आयपीएल २०२२ क्रिकेटचे सामने मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम येथील मैदानावर दिनांक २६ मार्च  २०२२ पासून सुरू होत आहेत. आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी मैदानावर तसेच हॉटेलवर मुंबई पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येत आहे. अतिरेक्यांकडून हॉटेल ट्रायडंट, वानखेडे स्टेडियम पर्यंतच्या मार्गांची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून इनपुट किंवा माहिती प्राप्त झालेली नाही. तरी आयपीएल क्रिकेट सामन्यांदरम्यान स्टेडियम व हॉटेलवर आणि मार्गावर पुरेसा सुरक्षा बंदोबस्त मुंबई पोलिसांकडून पुरविण्यात येत आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.



दरम्यान एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशी दरम्यान त्यांनी वानखेडे स्टेडियम, नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेल आणि खेळाडू राहत असलेल्या इतर हॉटेलचे रेकी केल्याचे उघड झाले असल्याची माहिती ती प्रसिद्ध झाली होती. दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर साऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.



खेळाडूंच्या बसला कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी विशेष सुरक्षा कडे पुरवण्यात येणार आहे. हॉटेलमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था सोबतच पंच आणि सामना अधिकाऱ्यांनी सुरक्षा पुरविली जाणार आहे. तसेच सामन्यादरम्यान खेळाडूंच्या हॉटेल आणि स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गांवर पार्किंग करण्यास बंदी असणार आहे. त्याशिवाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ मार्च ते २२ मे या कालावधीत क्विक रिस्पॉन्स टीम, बॉम्ब शोधक व निकामी पथक आणि राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.























Press Note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज