मुंबई : सातरस्ता परिसरातील इमारतीला काल लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाने पाच जणांना सुखरूपरित्या वाचवले आहे. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
महालक्ष्मी सातरस्ता, जेकब सर्कल येथील विठ्ठल निवास ही इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काल दुपारी १२.१५ च्या सुमारास आग लागली होती अग्निशामक दलाला या घटनेची माहिती मिळताच जवानांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या पाच जणांना वाचवण्यात आल्याचे मुंबई अग्निशामक दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी सांगितले.
दरम्यान इलेक्ट्रिक वायरिंग, लाकडी सामान आदी या आगीत जळून खाक झाले. ८ फायर इंजिन, एक जेटी च्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे ते म्हणाले. आगीची माहिती मिळताच मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांना दिलासा दिला.
व्हिडिओ पहा...👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा