सीएसएमटी रेल्वे स्थानकावर रॅली
मुंबई, दादासाहेब येंधे : महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दरवर्षी २ जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
त्यानुसार पोलीस वर्धापन दिनाच्या अनुषंगाने रेझिंग डे सुरक्षा सप्ताहनिमित्त सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहमूब इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.३ जानेवारी २०२२) कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील मेनलाईन च्या फलाटावर हातातर फलक घेऊन लोहमार्ग पोलिसांनी रॅली काढली. या रॅलीमध्ये मेगाफोनद्वारे उद्घोषणा करून कोरोनाच्या वाढत्या संसर्गात आपल्या सुरक्षित आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती मदकट्टे, पोलीस उप निरीक्षक तानाजी भांडबलकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगेश साळवी तसेच १२ पोलीस अंमलदार, कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते.
व्हिडीओ👇 पहा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा