१२ हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात यश
मुंबई : लोणावळा येथे बंगला बुकींगच्या नावाने एका महिलेची फसवणूक करणाऱ्या दोन बंधूंना वांद्रे प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. आकाश रुपकुमार जाधवानी आणि अविनाश रुपकुमार जाधबानी अशी या दोन बंधूंची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.
पुण्याच्या विमाननगर परिसरातून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अटकेने १२ हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांच्या चौकशीत या दोघांनी अशाच प्रकारच्य अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या अटकेन १२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली.
या दोघांविरोधात पवई, मलबार हिल, डी. बी मार्ग, चुन्नाभट्टी, दादर, पिंपरी-चिंचवड, नयानगर, मुलुंड, खांडेश्वर आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे.
अनेक गुन्ह्यांमध्ये या दोघांना पाहिजे आरोपी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या दोघांचा ताबा लवकरच संबंधित पोलिसांना देण्यात येणार आहे.
नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने अनेकजण फिरायला विविध रिसॉर्ट, व्हिला, हॉटेल्स आणि बंगलो बुक करतात त्याचा फायदा घेऊन काही सायबर ठगांनी फसवणुकीस सुरुवात केली होती. सोशल मीडियावर अशा हॉटेल्स, व्हिला, बंगला आणि रिसॉर्टच्या बुकींगच्या नावाने जाहिरा करून सर्वसामान्यांची फसवणूक झाल्याच्या काही तक्रार सायबर सेल पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या, ६ डिसेंबरला वांद्रे येथे राहणाऱया एका महिलेने सोशल मीडिवावर पाहिलेल्या जाहिरातीवरुन लोणावळा येथे एक बंगला बुक केला होता.
समोरील व्यक्तीने एका दिवसासाठी बंगल्याचे भाड ७२ हजार रुपये सांगितले होते. तिला दोन दिवस तिथे राहायचे होते, त्यामुळे तिने ७२ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करून बंगला बुक केला होता. २२ डिसेंबरला तिने बंगल्याच्या केअरटेकरला संपर्क साधला असता त्याचा मोबाईल क्रमांक अस्तिस्तात नसल्याचे तिला समजले त्यामुळे तिने तिच्यासोबत पार्टीला येणार्या मित्रांना ही माहिती दिली. त्यांनी बंगल्याच्या मालकाला फोन केला असता त्यांना अशा प्रकारे इतर काही व्यक्तींनी कॉल केल्याचे सांगून त्यांनी कोणालाही बंगला भाड्याने दिलेला नसल्याचे सांगितले.
आपली फसवणूक झाल्याचे उघडकीस येताचया महिलेने सायबर सेल पोलिसांना ही माहिती सांगून संबंधित ठगाविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या ठगाचा शोध सुरू केला होता. तपासात हे ठग स्वत:चे वास्तव्य सतत बदलत असल्याचे आढळून आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांचे लोकेशन पुण्याच्या विमाननगर परिसरात होते. त्यामुळे सायबर सेल पोलिसांनी तिथे जाऊन आकाश जाधवानी आणि अविनाश जाधवानी या दोन बंधूंना ताब्यात घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा