हायकोर्ट परिसरात धामण साप - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

हायकोर्ट परिसरात धामण साप

पोलीस शिपाई यामुळे जीवदान

मुंबई : मुंबई उच्च न्यायालय परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास धामण जातीचा साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वैभव केदर या पोलिस शिपायाने इको-एको फाउंडेशनशी संपर्क केला. संस्थेचे संस्थापक नितीन वाल्मिकी यांनी माहिती मिळाल्यावर तातडीने मुंबई उच्च न्यायालय परिसरात धाव घेतली. त्यानंतर साडेपाच फुटी धामण सर्पाला ताब्यात घेतले. पोलीस शिपायामुळे या सापाला जीवदान मिळाले असे संस्थेकडून सांगण्यात आले. त्यानंतर सर्पाची तपासणी करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे. त्याआधी सोशल मीडियावर सर्पाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते.














Viral photo

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज