आर्थिक फसवणुक करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखा, कक्ष ६, चेंबूर कडून पर्दाफाश.... - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, २३ जानेवारी, २०२२

आर्थिक फसवणुक करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखा, कक्ष ६, चेंबूर कडून पर्दाफाश....

बनावट शासकीय कागदपत्र तयार करणारी व त्याद्वारे विविध बॅकेत अकाऊंट उघडून, अंवैधरित्या ऑनलाईन जुगार चालवून सामान्य जनतेची व शासनाची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणुक करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखा, कक्ष ६, चेंबूर कडून पर्दाफाश....


मुंबई, दादासाहेब येंधे : सद्याच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत असताना, ऑनलाईन गुन्हयांचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. गुन्हेगार देखील या आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सामान्य जनतेची आणि शासनाची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणुक करीत असल्याचे आढळून येत आहे. अशाप्रकारचे ऑनलाईन गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून नमुद गुन्हयांस प्रतिबंधक करणे हे पोलीसांमोरील मोठे आव्हान आहे. त्याबाबत गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याकरीता मा. पोलीस सह आयुक्‍त (गुन्हे) श्री.मिलींद भारंबे, आणि पोलीस उप आयुक्त, श्री. संग्रामसिंह निशाणदार यांनी मार्गदर्शन केले होते. 

 

कक्ष ६, गुन्हे शाखेचे पोलीस पथक त्याचअनुषंगाने गोपनीय माहिती घेत असताना, दिनांक १७/०१/२०२२ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने अत्यंत सावधपणे माहितीची खातरजमा करून, दिनांक १९/०१/२०२२ रोजी खारघर नवी, मुंबई याठिकाणी पोलीस पथकाने छापा टाळून एका लिंकद्वारे अवैध्यरित्या ऑनलाईन जुगार खेळविणारी व त्यासाठी प्राप्त होणारे पैसे विविध बॅक अकाउंटमध्ये स्विकारण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे बोगस बॅक अकाऊंट तयार करून स्वत:च्या आर्थिक फायदयासाठी जनतेची तसेच शासनाची आर्थिक फसवणुक करणाऱ्या टोळीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलीसांनी नमुद ठिकाणी मोठया प्रमाणात बनावट शासकीय कागदपत्र, ओळखपत्र, रबरी स्टॅम्प व इतर साहित्य हस्तगत केले असून, मुख्य आरोपीस अटक केली आहे. नमुद टोळीचे इतर साथीदार यांचा शोध सुरू आहे.

दिनांक १९/०१/२०२२ रोजी कक्ष-६,गु.प्र.शा.,गु.अ.वि. चेंबूर, मुंबई येथे नेमणूकीस असलेले पो.शि.क्र ०६१७०३/घेरडे यांना दिनांक १७/०१/२०२२ रोजी त्यांच्या खास विश्‍वासू बातमीदाराने माहीती दिली की, काही इसम हे त्यांच्या साथीदारासोबत एका लिंकद्वारे अवैध्यरित्या ऑनलाईन जुगार खेळवितात व त्यासाठी प्राप्त होणारे पैसे विविध बॅक अकाउंटमध्ये स्विकारतात त्यासाठी बॅक खाते उघडण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करतात.




सदर जुगार/गेममध्ये तीन कलर(ग्रीन, रेड, व्हॉलेट) व ० ते ९ असे खेळण्यासाठी आकडे आहेत. एका वेळेस आपण एक कलर, एक आकडा किंवा कलर व आकडा दोन्ही वर पैसे लावु शकतो. रक्‍कम १० (दहा रूपये), १००(शंभर रूपये), १०००(एक हजार रूपये), १००००(दहा हजार रूपये) अशा पटीत आकडा निवडुन खेळु शकतो.

जिंकणाऱ्याला रेड व ग्रीन रंगाला दोनपट पैसे म्हणजे १० रूपये लावले असेल तर २० रूपये मिळतील, व्हॉलेट  रंगाला पाचपट, तसेच ० ते ९ असलेल्या कोणत्याही आकडयावर १० पट पैसे मिळतात. अशा रितीने अवैध्यरित्या ऑनलाईन जुगार खेळायला लावुन विवीध बॅकेच्या अकाउंट मार्फत मोठया रक्कमा स्विकारून शासनाची फसवणुक केली जाते.


दिनांक १९/०१/२०२२ रोजी स.पो.नि. चव्हाण यांनी प्रापत झालेली जुगारासाठी असणारी लिंक पंटरच्या मोबाईलमध्ये रन केली व पंटरच्या मोबाईल फोनमध्ये लिक अधारे winmoney हा गेम रजिस्टर करण्यात आला. त्यावेळी ओपन झालेल्या winmoney च्या विंडोमध्ये स्क्रोल डाउन केल्यावर download application या  ऑप्शन दवारे winmoney हे अप्लीकेशन डाउनलोड करण्यात आले व त्यामध्ये २००/रू. रक्कमेचे रिचार्ज करण्यात आले. त्यांनतर सदरहू गेममध्ये आकडयांवर रक्‍कम लावून, जुगार खेळला जातो का? व त्यातून रक्कम वजा होते का? याबाबत खात्री केली असता, ऑनलाईन जुगार खेळला जावून, हरल्यानंतर रक्‍कम वजा होत असल्याची खात्री करण्यात आली. सदरची रक्‍कम आरोपींच्या कोणत्या बॅक खात्यात वर्ग होत आहे याबाबत विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फतीने माहिती घेतली. सदर बॅक खात्याची माहीती घेतली असता सदरचे खाते हे Current Account असल्याची माहीती मिळाली.


त्यानंतर गोपनीय बातमीदाराने दिलेली बातमी व त्याआधारे तांत्रिक विश्लेषण करून, ऑनलाईन जुगार चालविणारा व गुन्हयातील बनावट कागदपत्र तयार करणारा मुख्य आरोपी याचा खारघर, नवी मुंबई येथील ठावठिकाणा शोधून, मा. पोलीस उप आयुक्त, डी-१, गुन्हे शाखा मुंबई यांच्या आदेशान्वये स.पो.नि. चव्हाण, मसपोनि कुदळे आणि पोउपनि मुठे यांचे नेतुत्वाखाली पोलीस पथके तयार करण्यात आली व सदरठिकाणी सापळा रचून शिताफिने मुख्य आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याचे ताब्यातून रू. २०००/-, ५००/-रु. इतक्या किमतीचे बनावट शासकीय मुद्रांक, विविध शासकीय व निमशासकीय आस्थापनांचे नावाने बनविलेले रबरी स्टॅम्प, स्टॅम्प पेपरला चिटकविण्यासाठी लागणारे नोटरी लेबल, स्टॅम्प बनविण्यासाठी वापरण्यात येणारी निगेटिव्ह, बनावट आधारकार्ड, बनावट पॅनकार्ड, बनावट मतदार कार्ड, बनावट आर.सी.बुक, रबर स्टॅम्प बनविण्यासाठी वापरण्यात येणारी शाई व प्लास्टिक हॅण्डल, विविध बॅकेंची चेकबुक व पासबुक, कोरे लिव्हिंग सर्टीफिकेट, एक संगणक, १ उच्च दर्जाचा कलर प्रिंटर, १ मोबाईल असे एकूण १,१०,०००/रू. किमतीचे साहित्य हस्तगत करण्यात आले. नमुद गुन्हयातील अटक आरोपीविरूध्द चेंबूर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला असून, नमुद गुन्हयाचा पुढील तपास कक्ष ६, गुन्हे शाखेचे स.पो.नि. मंगलसिग चव्हाण करीत आहेत. अटक आरोपीविरूध्द यापूर्वी तुर्भ पोलीस ठाणे, बेलापूर पोलीस ठाणे, भाईंदर पोलीस ठणे, मुलूंड पोलीस ठाणे आणि खंडणी विरोधी पथक, मुंबई याठिकाणी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणुक केल्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत.


सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्‍त (गुन्हे) श्री.मिलींद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्‍त श्री विरेश प्रश्नु, मा.पोलीस उप आयुक्त, (प्र-१) श्री. संग्रामसिंह निशाणदार ,मा. सहाय्यक पोलीस आयुकक्‍्त(डी-पुर्व), श्री. नितिन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, या कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, स.पो.नि. मंगलसिंग चव्हाण, मसपोनि अर्चना कुदळे, स.पो.नि. सचिन गावडे, पोलीस उप निरीक्षक सुभाष मुठे, स.फौ. नितीन सावंत,विनय सकपाळ, स.फोौ. प्रकाश आव्हाड, पोलीस हवालदार उज्वल सावंत, पोलीस हवालदार बंडाले,पोलीस हवालदार देसाई, पोलीस नाईक विजय भिलारे, नितीन तुपे, विद्यानंद शिंदे, विनोद गायकवाड, दिपक मोरे, राहुल आराख, पोलीस शिपाई सुरेश घेरडे, दिगंबर माळवेकर, संजय भालेकर, संभाजी कोळेकर, अमोल इंगळे, कृष्णा पवार, रणजित चव्हाण, समीर शेख, म.पो.शि संगिता अभंग,पो.ना.चा.वसंत डाळे, पो.ना.चा.गणेश कदम,पो.ना.चा. गोकूळ जायभाये यांच्या पथकाने पार पाडली.


















 Press Note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज