मुंबई : भायखळा येथील मुस्तफा बाग परिसरातील काल लाकूड गोदामाला लागलेली आग ही लेव्हल-२ ची होती. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांनी आग विझवली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
0 टिप्पण्या