मुंबई, दि. १७ : खार पश्चिमेलाही एका चाळीत गॅस सिलेंडर मधून गळती होऊन लागलेल्या आगीत सहा जण भाजल्याची घटना ताजी असतानाच वांद्रे पश्चिमेला असलेल्या नर्गिस दत्तनगरमधील दुमजली झोपड्यांना बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. यात साधारण १० ते १२ झोपड्या खाक झाल्या. तर दोन जण जखमी झाले आहेत. वांद्रे पश्चिमेला के.सी. मार्ग ते नर्गिस दत्तनगर मध्ये मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. त्यामध्ये दुमजली झोपडपट्ट्यांची संख्या अधिक आहे. गेल्या काही वर्षात या परिसरातील झोपड्यांना अनेकदा आग लागली आहे.
बुधवारी पहाटे ४:४५ सुमारास एका झोपडीलाआग लागली. ही आग पसरत गेली व दाटीवाटीने असलेल्या झोपड्या, इलेक्ट्रिक वायर, लाकडी आणि पत्र्यांच्या सामानामुळे ती दहा ते बारा झोपड्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांनी बाहेर गाव घेतली. त्यानंतर आज विझवण्यासाठी झोपडपट्टीवासीयांकडून प्रयत्न सुरू झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा