कांजूरमार्ग येथे गगनचुंबी इमारतीत आग - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, १ मार्च, २०२२

कांजूरमार्ग येथे गगनचुंबी इमारतीत आग

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून सोमवारी दीड वाजण्याच्या सुमारास कांजूरमार्ग पूर्वेकडील स्थानकानजीकच्या एन.जी. रॉयल पार्क या तळमजला अधिक अकरा मजली इमारतीच्या अकराव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. 




आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा फायर इंजिन आणि चार जेटीच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेतले होते. गगनचुंबी इमारतीला लागलेल्या आगीमुळे अग्निशामक दलाच्या जवानांना तिथपर्यंत पोहोचणे कठीण जात होते. पण, जवानांनी इमारतीमध्ये वास्तव्य करत असलेल्या लोकांना सुरक्षितरित्या खाली उतरवले शिवाय आग विझवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज