उच्च न्यायालयासमोरील घटना
मुंबई : काळा घोडा, फाउंटन, मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट नंबर ५ समोरील रस्त्यावर उघड्या मॅनहॉलमध्ये शनिवारी दुपारी दोन जण पडले. यामध्ये पिंटू सिंग (३४) याचा मृत्यू झाला. तर सुकुमार सिंग (३५) हा जखमी झाला. शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या गेट नंबर ५ समोरील रस्त्यावरून जाणाऱ्या दोन व्यक्ती उघड्या मैदानावर हॉलमध्ये पडल्याची घटना घडली. या वेळी ये-जा करणाऱ्यांचे लक्ष या घटनेकडे गेल्याने हा सर्व प्रकार लक्षात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा