मुंबई : कुठे ढोलताशा तर कुठे लेझीमचा गजर, फुलांचा वर्षाव.... स्वागतासाठी काढलेल्या रांगोळ्या, प्रवेशद्वारावरच औक्षणासाठी उभा शिक्षकवर्ग अशा उत्साहपूर्ण वातावरणात मुंबईतील पहिली ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकले.
महापालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर तब्ब्ल २० महिन्यांहून अधिक काळानंतर मुंबईतील पहिली ते सातवीच्या शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरु झाल्या आणि या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विदूषकाच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना व पालकांना मास्कचेही वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा