मुंबई : प्रेयसीवर पैसे उडवण्यासाठी मोटारसायकल चोरून त्याची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना क्राईम ब्रँच -८ ने अटक केली. नवरंग अरुण पंडित आणि विवेक गुप्ता अशी त्या दोघांची नावे असून त्या दोघांकडून पोलिसांनी चोरीच्या चार मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. त्या दोघांना अटक करून वाकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यात चार मोटारसायकली चोरीला गेल्या होत्या. मोटारसायकल चोरी प्रकरणी वाकोला पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा