कर्त्यव्याची जाण असलेला सैनिक
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई पोलिसांच्या एका कर्मचार्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी एका दिव्यांग व्यक्तीला हात पकडून रस्ता पार करून देताना यातून दिसत आहे.
ज्या वृद्ध दिव्यांग व्यक्तीला रस्ता पार करून दिला जात आहे ती व्यक्ती लहान चाके लावलेल्या लाकडाच्या गाडीवर बसली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्स या पोलिस कर्मचार्याला अभिवादन करत आहेत.
हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सोनवणे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रोडवर एका दिव्यांग व्यक्तीला रस्ता पार करून देताना दिसत आहेत.
ही क्लिप आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केली आहे. त्यांनी त्याला कॅप्शन देताना ते म्हणतात, 'दयाळूपणाचे एक छोटेसे उदाहरण'. हा व्हिडिओ आतापर्यंत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ पहा...👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा