परेलमध्ये चाळ संस्कृती देखावा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

demo-image

परेलमध्ये चाळ संस्कृती देखावा

मुंबई, दादासाहेब येंधे : परेल येथे राहणारे पराग सावंत व सहकाऱ्यांनी बाप्पासाठी लालबाग परळ या गिरणगावातील देखावा साकारला आहे. मुंबईत गिरणी सुरू झाल्यावर देशातील विविध भागांतून नागरिक येथे आपली संस्कृती, भाषा, परंपरा घेऊन आले. गिरणगावातील गणेश उत्सव जगाच्या पाठीवर आपली छाप सोडून आहे. इथल्या चाळ संस्कृतीत दडलेला गणेशोत्सव फार विशेष असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याच गिरण्या चालू झाल्या तर उत्सवाचे रूप कसे असेल हे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. या देखाव्यात लालबाग परळ येथील भारतमाता सिनेमा व त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या चाळी व गिरण्यादेखील दाखविण्यात आल्या आहेत.

Ganapati001




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *