राज्यातील बार, दारूची दुकाने, मॉल सुरू करणाऱ्या: मात्र कोरोनाचे कारण पुढे करत मंदिरे उघडण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारच्या विरोधात सोमवारी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पश्चिम येथे आंदोलन करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे वर्षभरापासून राज्यातील मंदिरांचे दरवाजे बंद आहेत. रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर सरकारने राज्यातील सर्व निर्बंध शिथिल केले; मात्र मंदिरं बंद ठेवली. करोडो हिंदू भाविकांच्या श्रद्धेच्या सोबतच मंदिरावर उपजिविका अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. राज्यात सगळं काही सुरू आहे. मग धार्मिक स्थळांचेच वावडे का..? असा सवाल करत भारतीय जनता पक्षाने मंदिर उघडा आंदोलन हाती घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा