भाजपतर्फे मंदिरं उघडण्यासाठी घंटानाद! - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

demo-image

भाजपतर्फे मंदिरं उघडण्यासाठी घंटानाद!

बाबुलनाथ मंदिराजवळ सोमवारी आमदार व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. मुनगंटीवार यांच्यासह कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, राज्यभरात देशी-विदेशी दारूला विक्रीस परवानगी आहे; मात्र मंदिरे उघडायला परवानगी नाही. आमची सरकारकडे ही मागणी आहे की ज्यांचे लसीचे दोन दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना मंदीर प्रवेश द्या. देशी विदेशी दारूसाठी हे सरकार सवलत देते. दारूशिवाय रक्तामध्ये चैतन्य येत नाही का..? असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर त्यांनी तोफ डागली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *