दिवसा कपड्यांचा व्यवसाय रात्री कोकेनची तस्करी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

demo-image

दिवसा कपड्यांचा व्यवसाय रात्री कोकेनची तस्करी

खारमध्ये नायजेरियन माफियाला अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : मोहम्मद अली रोड येथे दिवसा कपड्याचा व्यवसाय आणि रात्री पश्चिम उपनगरातील नशेबाजांचे चोचले पुरवण्यासाठी कोकणची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन ड्रग माफियाला अंमली पदार्थ विरोधी पक्षाच्या वांद्रे युनिटने खार येथे रंगेहात पकडले. त्याच्याकडे एक किलो ३०० ग्रॅम वजनाचा व तीन कोटी ९० हजार रुपये किमतीचा कोकेनचा साठा मिळून आला. नायजेरियन ड्रग्ज तस्कर खार पश्चिमेकडील रामकृष्ण रोड येथे उच्च प्रतीचा कोकणचा साठा स्थानिक पेडलर्सना विकण्यासाठी येणार असल्याची खबर वांद्रे युनिटचे अंमलदार मांढरे यांना मिळाली. त्यआधारे प्रभारी निरीक्षक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एपीआय सुशांत बंडगर, सुरेश भोये, उपनिरीक्षक पवळे, अंमलदार मांढरे, सौदाणे, खारे, केंद्रे आदींच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार नायजेरियन ड्रग्ज माफिया तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्यच्याकडील सॅक बॅगची तपासणी केली असता त्यात एक किलो ३०० ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा कोकेनचा साठा मिळून आला. २०१६ साली मुंबईत आल्यापासून तो ड्रग्ज तस्करी करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

1630212359784_ANC+Crime+Branch


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *