राज्य शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत सिडको भवन येथे रक्तदान शिबिर संपन्न
राज्यामध्ये निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता श्री. उद्धव ठाकरे, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व श्री. राजेश टोपे, मा. आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहनास प्रतिसाद देत डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली व सिडको कर्मचारी संघटनेच्या सहभागाने सिडकोमध्ये दिनांक २१ डिसेंबर २०२० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोविड – १९ संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून हे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा