व्हाट्सअप बघत असताना मोबाईल लांबवला - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

demo-image

व्हाट्सअप बघत असताना मोबाईल लांबवला

लोकल ट्रेनमध्ये मोबाईल सांभाळा -लोहमार्ग पोलीस

मुंबई :  ट्रेनमध्ये बसलेले असताना व्हाट्सअप वरील मेसेज चेक करताना एका चोरट्याने झडप घालून हातातला मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना घडली आहे. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर स्थानकारम्यान हा प्रकार घडला असून याप्रकरणी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे अशोक खांडके हे आपली ड्युटी संपवून घरी परतत होते. खांडके यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकातून पनवेलला जाणारी लोकल ट्रेन पकडली होती. लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असल्याने गाडीमध्ये मोजकेच प्रवासी होते. खांडके दरवाजाजवळ असलेल्या आसनावर बसले होते. प्रवासात टाईमपास म्हणून ते व्हाट्सअपवर आलेले मेसेज वाचत असताना रात्री अकराच्या सुमारास ही लोकल मशिद बंदर स्थानकात पोहोचली. 

अचानक एका इसमाने खांडके यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत धावत्या लोकलमधून उडी मारत पळ काढला. त्या चोराचा पाठलाग करण्यासाठी लोकलमधून उतरणार तितक्यात लोकल सुरू झाली. खांडके यांनी याप्रकरणी सीएसएमटी  लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

20201223_124943


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *