हार्ट अटॅक आल्याने बसचा अपघात, चालकाने वाचवले प्रवाशांचे प्राण
मुंबई, दादासाहेब येंधे : हार्ट अटॅक आल्याने चेंबूर येथे बेस्टच्या बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. मात्र, बस चालकाने बसवर नियंत्रण राखत बेस्ट बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हरिदास पाटील असे बसचालकाचे नाव आहे. फुटपाथवरील एका भाजीच्या दुकानात बस घुसली आणि बाजूलाच असलेल्या सिग्नलला धडकून थांबली. बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. तर, बसचालकावरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा