सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे ‘राष्ट्रीय पोलीस शहीद दिन’ साजरा
मुंबई, दादासाहेब येंधे: २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लदाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी गस्त घालणाऱ्या १० पोलीस जवानांवर दबा धरून बसलेल्या चीनी सैनिकांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्याला पोलीस जवानांनी कडवी झुंज दिली, दुर्देवाने, या हल्ल्यात हे पोलीस शहीद झाले. या घटनेमुळे देशभर शोककळा पसरली. वीर जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी तसेच कर्तव्य आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून तसेच सर्व शहीद पोलीस बांधव, जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर 'पोलीस हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो.
काल (दि.२१/१०/२०१९ रोजी) हुतात्मा दिनाच्या निमित्ताने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे समोरील प्रांगणात मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस निरीक्षक शशांक चंद्रसेन शिंदे यांची प्रतिमा ठेवून त्यास पुष्पहार अर्पण करण्यात येवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रसंगी मा.श्री.रविंद्र सेनगावकर, पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई. मा.श्री.एम. एम. मकानदार,पोलीस उपायुक्त,मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई., मा.श्री.राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, सीएसएमटी विभाग, लोहमार्ग मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे श्री.हेमंत बावधनकर, श्री.उत्तम सोनावणे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा व इतर अधिकारी तसेच उपस्थित होते.
सदर वेळी लोहमार्ग पोलीस आयुक्तालयात शहीद झालेले पोलीस निरीक्षक शशांक चंद्रसेन शिंदे ,पोलीस हवालदार सुहास ईश्वरा जाधव व पोलीस शिपाई रामदास रोहिदास हराळे यांना आपले कर्तव्य बजावताना आलेल्या वीरमरण व शौर्या बाबत माहिती सर्वाना देण्यात आली त्यानी बजावलेल्या शौर्यास सलाम करुन,त्यांचे पवित्र स्मृतिस अभिवादन करण्यात येवून श्रद्धांजलि वाहण्यात आली. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या अशा कर्तव्यनिष्ठ पोलीस जवानांना श्रद्धांजली!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा