महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हुतात्म्यांना अभिवादन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, १ मे, २०२३

demo-image

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. १ : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत  प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महागरपलिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय.एस.चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, निवासी जिल्हाधिकारी सदानंद जाधव उपस्थित होते.

%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या. यावेळी राजशिष्टाचार विभाग,महानगर पालिका,पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

1443

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *