स्नॅचिंग करणा-या गुन्हेगारांची धरपकड
गुन्हे शाखा, नवी मुंबईच्या कक्ष-१ चे आधिकरी आणि कर्मचा-यांचे पथक चेन स्नॅचिंग करणा-या गुन्हेगारांचे मागावर असताना पोह/१५५७, बालाजी चव्हाण आणि पोकॉ/३५३८,संतोष मिसाळ यांना खबर मिळाली की, दोन ईसम तुर्भे स्टेशन जवळ त्यांचे ताब्यातील गोण्यांमध्ये वेगवेगळ्या कंपन्याचे मोबाईल फोन, स्पिकर्स, चार्जर्स, हेडफोन्स व इतर मोबाईल अँक्सेसरीज आणि नविन टी शर्टूस, अंडवियर बनियान हे कमी किंमतीत विकीकरण्यासाठी ग्राहक शोधत आहेत वरुन वरिष्ठ पो.नि. सुभाष निकम यांनी सपोनि हर्षल कदम यांचे पथकास सदर ठिकाणी जावुन बातमीची खातरजमा करुन सदर ईसमांचे विरुध्द कारवाई करण्यासाठी पाठविले.
तुर्भे रेल्वेस्टेशन वर जावुन त्यांनी वर्णनातील नमुद इसमांचा शोध घेतला असता ते सार्वजनिक पार्किग येथे आडबाजुस थांबुन ग्राहकांना बोलावुन त्यांचे ताब्यातील चिजवस्तु विकत असतांना त्यांना शिताफिने चारही बाजुंनी घेरून सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नावे विचारले असता त्यांनी ती १. रिझवान मकबुल खॉन वय २८ वर्ष, रा. एकता नगर, शिळफाटा, कल्याण, ठाणे २. जावेद शाहनहान शेख, वय २२ वर्ष, रा. मदिना चाळ, शिळफाटा, कल्याण, ठाणे. असे सांगीतले. त्यांचे कब्ज्यामध्ये वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे ५१ मोबाईल हॅन्डसेट्स, स्पिकर्स, हेडफोन्स, मेमोरी कार्डस, ब्लू टुथ स्पिकर्स, चार्नर्स, डेटा केबल इत्यादी मोबाईल संबंधित साहित्य तसेच नॉकी कंम्पनीचे वेगवेगळ्या साईनचे व रंगाचे नविन टी शर्टूस, अंडवियर बनियान असा एकुण १,१७,२८०/- रु किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
सदर संशयीत इसमांकडे मिळुन आलेल्या मालाबाबत सखोल तपास करता त्यांनी सदरचे मोबाईल व इतर ऐक्सेसरीज हे दोन दिवसांपुर्वी तळोजा गावातील मोबाईल शॉपी येथुन घरफोडी चोरी करुन चोरल्याचे सांगीतले तसेच जॉकीचे नवीन कपडे हे कोपरखैरणे येथील डि मार्ट जवळील या कपड्याच्या मॉल मधुन घरफोडी चोरी करुन चोरल्याचे सांगीतले.
'सदरबाबत खालील प्रमाणे गुन्हे नोंद आहेत.
१) पोलीस स्टेशन तळोजा, गुरनं २०८/२०२० भादवि कलम ४५७, ३८०, ३४
२) पोलीस स्टेशन कोपरखैरणे गुरनं २२७/२०२० भादवि कलम ४५७, ३८०, ३४
यातील अ.क. १ हा गुन्हा गुन्हे शाखा कक्ष-१ ने अवघ्या ६० तासांत उघडकिस आणलेला आहे.
यातील आरोपी कृ. १ रिझवान मकबुल खॉन वय २८ वर्ष, रा. एकता नगर, शिळफाटा, कल्याण, ठाणे हा
रेकॉर्डवरील घरफोडी, चोरी तसेच शरीराविरुध्दचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगांर असुन तो प्रत्येक वेळी नविन - नविन वेशभुषा करुन नविन साथीदाराचे मदतीने गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. त्याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) डायगर पोलीस स्टेशन, ठाणे गुरनं ११८६/१४ भादवि कलम ३२६,५०४, ३४
२) पनवेल तालुका पोलीस स्टेशन, नवी मुंबई, गुरनं १९७/२०१८ भादवि कलम ४५४,४५७, ३८०
३) पनवेल तालुका पोलीस स्टेशन, नवी मुंबई, गुरनं ३७/२०१८ भादवि कलम ४५४, ४५७, ३८०
४) कनकवली पोलीस स्टेशन, रत्नागिरी गुरनं १६/२०२० भादवि कलम ४५७, ३८०, ३४
५) नवघर पोलीस स्टेशन,मुंबई गुरनं १९७/२०१८ भादवि कलम ४५४,४५७,३८०
मा.पोलीस सह आयुक्त डॉ बी जी शेखर, मा. पोलीस उप आयुकत गुन्हे श्री प्रविण पाटिल यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष निकम, सपोनि श्री राहुल राख, सपोनि रुपेश नाईक, सपोनि हर्षल कदम, पोलीस कर्मचारी रोहिदास पाटिल, बालाजी चौहान, शशिकांत जगदाळे, संतोष मिसाळ, धनाजी भांगरे, दिपक मोरे यांचे पथकाने सदरची कारवाई यशस्वी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा