मुंबई, दि. १० : पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून गाडीतील मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीस वांद्रे पोलिसांनी नुकतीच अटक केली. अभिमन्यू अर्जुन गुप्ता उर्फ रिंकू असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे २४ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्या विरुद्ध मुंबई सह ठाणे , नवी मुंबईतील पोलीस ठाणेत चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0 टिप्पण्या