मुंबई, दि. १५ : ड्ग्जसहीत मनी लाँड्रिंगमध्ये कारवाईची भीती दाखवून विदेशी नागरिकांची फसवणुक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. पवई येथे सुरु असलेल्या एका बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून हा फसवणुकीचा प्रकार सुरु होता.

याच प्रकरणात चार मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आदिल निसार अहमद सय्यद, अफाज मोसीन अली, मार्शल सेल्वराज आणि अविनाश गोपाळ मुदलीयार अशी या चौघाचीं नावे आहेत. त्यांच्या इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत पोलिसांनी २५ लॅपटॉप, सहा मोबाईल फोन असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

2217
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा