मुंबई, दि. १६ : १ कोटी १८ लाख रुपयांच्या चरस आणि हायड्रो गांजाच्या साठ्यासह चारजणांच्या टोळीला अण्टी नार्कोटिक्स सेलच्या बांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

जुहू आणि सांताक्रुज परिसरात ही कारवाई करण्यात आली. निको फिलीप गोन्साल्वीस, सचिन किरण नांदे, कॅरीगटन जेरी डिआत्रीओ आणि हर्षद शंकर परुळेकर अशी या चौघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत एल एंडम पिटर डिसोझा फरार आहे. जुह॒ येथे काहीजण ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून चौघांना अटक केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा