रंगारी बदक चाळीत पुन्हा महिला शक्ती - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

demo-image

रंगारी बदक चाळीत पुन्हा महिला शक्ती

मुंबई, दि. १५ : रंगारी बदक चाळ, काळाचौकी येथील समर्थ हनुमान मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रौत्सवात मोठया उत्साहात साजरा करण्यात येत असून भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिची महाराष्ट्रभर ख्याती आहे. गुजराती, मराठी, बंगाली असे सर्व भाषिक मंडळी या देवीला साकडे घालण्यासाठी नवरात्र उत्सवात गर्दी करताना दिसून येतात. भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या या मातेचे कधीही विसर्जन होत नाही, हे खास वैशिष्टय आहे. 

%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%95%20%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE,%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A5%80

श्री समर्थ हनुमान मंडळ यांचेतर्फे दरवर्षी नवरात्रोत्सवादरम्यान महिलांकडून मोठया प्रमाणात देवीच्या नावाचा जप (नामस्मरण) करून घेतला जातो. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, पाककला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, लहान मुलांसाठी बडबड गीते, कॅरम -बुद्धिबळ, चित्रकला स्पर्धा, मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे.

%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%95%20%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0,%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3

यावर्षी मंडळाचे ६९ वे वर्ष असून पुरुषांसोबत महिलावर्गही या मंडळात मोठ्या हिरीरीने भाग घेत असतात. याची मंडळाने नोंद घेत यावर्षी पुन्हा एकदा महिलाशक्तीला न्याय मिळावा म्हणून एकमताने मंडळाच्या पदाधिकारी म्हणून अध्यक्षा- सौ. कांता कदम, कार्याध्यक्षा-सौ. रेशमा मानगांवकर, सरचिटणीस-सौ.नमिता दळवी, खजिनदार-सौ. रोहिणी परब यांची निवड केली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *